पारोळा ( प्रतिनिधी ) – शहरातील भाजपाचे जेष्ठ मार्गदर्शक स्व. मुरलीधर दाणेज यांच्या आजच्या सातव्या स्मृतीदिवसानिमित्त न्हावी गल्ली येथे “मोफ़न नेत्र तपासणी शिबिर” आयोजीत करण्यात आले होते.
या प्रसगी शहरातील प्रतिष्ठित मान्यवर, संघ कार्यकर्ते, भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि व्यापारी प्रामुख्याने हजर होते. शिबीरात १३४ गरजूंची नेत्र तपासणी करण्यात आली त्यातील ५२ रुग्नांची “मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे निश्चीत करण्यात आले. ६४ रुग्नाना चश्मा” वाटप करण्यात येणार आहे. यावेळी आदर्श शिक्षक स द भावसार , उद्योजक गोपाल अग्रवाल , भाजपा मार्गदर्शक दतूनाना भावसार , आयुर्विमाचे मारदर्शक मिलींद मिसर, मुख्याध्यापक रवींद्र पाटील , दौलत पाटील, भा. ज. पा. तालुकाध्यक्ष अतुल मोरे, भाजपाचे पदाधिकारी, अनिल टोळकर, भोलाभाऊ भावसार, प्रमोद भावसार, सुनील भालेराव , पत्रकार अभय पाटील, पत्रकार भूपेंद्र मराठे आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली अनेकांनी स्व. मुरलीधर दाणेज यांच्या स्मृतींना उजाळा देवून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.