जळगाव ( प्रतिनिधी ) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात शपथ घेण्यात आली.
पोलीस उपअधीक्षक.शशिकांत पाटील यांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या संदेशाचे वाचन केले यावेळी पो नि .संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील व सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, .हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनिल शिरसाठ,पो.कॉ.प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांची उपस्थिती होती.
आज काव्यरत्नावली चौक, नवीन बस स्टँड, टावर चौक, नेरी नाका या ठिकाणी अँटी करप्शन ब्युरो यांचेशी संपर्क साधण्याचे संपर्क क्रमांक, टोल फ्री क्रमांक व वेबसाईट नमूद असलेले फलक लावण्यात आले. शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये अँटी करप्शन ब्युरो विभागाचे संपर्क क्रमांक असलेले स्टीकर लावण्यात आले व गर्दीच्या ठिकाणी हॅण्डबील वाटप करण्यात आले.