जळगाव ( प्रतिनिधी )- राज्यासह जिल्ह्यात उद्यापासून दक्षता जागृती सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
राज्यात दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत अँन्टी करप्शन ब्युरोतर्फे या सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. २६ ऑक्टोबररोजी भ्रष्टाचार निर्मुललाची शपथ घेऊन कार्यक्रमांचा प्रारम करण्यात येईल .नंतर राज्यपाल व मुख्यमंत्री यानी दिलेले संदेश वाचन करण्यात येईल . शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट पध्दतीचे समुळ उच्याटन करण्यासाठी जागृती मोहिम राबविण्यात येते .
अँन्टी करप्शन ब्युरोधी कार्यप्रणाली, भ्रष्टाचार विरोधी कायद्याची माहिती आणि अंमलबजावणी याबाबत जागृती करण्यात येते शहरात नविन बस स्थानक, स्वातंत्र्य चौक, सेशन कोर्ट चौक. रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणी बॅनर लावण्यात येणार आहेत. २८ ऑक्टोबररोजी जळगाव आकाशवाणी केंद्रावर मुलाखत जळगांव प्रसारीत होणार आहे. मुलजी जेठा महाविद्यालय, नुतन मराठा महाविद्यालय व नाहाटा महाविद्यालय (भुसावळ) येथील विदयार्थी , विदयार्थीनीं यांना भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल जैन उद्योग समुहाच्या सहकार्याने जिल्ह्यात ग्रामीण भागात स्टिकर्स व पोस्टर्स लावण्यात
येतील शहरातील प्रमुख चौकामध्ये पथनाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपणाकडेस कोणत्याही शासकीय अधिकारी , कर्मचारी यांनी शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विमागाशी संपर्क साधावा.