मुंबई (वृत्तसंस्था ) ;- दिवसा ढवळ्या तीन जणांनी गोळी झाडून ज्वेलर्स मालकाची हत्या केली आहे. दहिसर पूर्व येथील गावडे नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.

ओम साईराज ज्वेलर्स असं या ज्वेलर्स दुकानाचे नाव आहे. तीन अज्ञात व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून ओम साईराज ज्वेलर्स शिरले आणि त्यांनी दुकानात लूट केली. यावेळेस ज्वेलर्स मालकानं त्याला विरोध केला असता त्याच्यावर लुटारुंनी गोळी झाडली. यात मालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
दहिसर पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून मुंबई पोलिसांचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेतील तिन्ही आरोपी फरार झालेत. मुंबई पोलिसांनी सर्व मुंबई एन्ट्री पॉईंटवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहे.







