मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबीने समन्स बजावल्यानंतर बड्या अभिनेत्रींचे धाबे दणाणले आहेत. चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण गुरुवारी दुपारी मुंबईत दाखल झाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज (25 सप्टेंबर) दीपिकाला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार दीपिकाची २६ सप्टेंबर म्हणजेच उद्या (शनिवारी 26सप्टेंबर) एनसीबीकडून चौकशी होणार आहे.
यातच दीपिकाची उद्या चौकशी होणार असल्याने तिचा पती रणवीर सिंह हा वकिलांची जुळवाजुळव करत आहे. तसेच चौकशीपूर्वीच अभिनेता रणवीर सिंहने चौकशीवेळी दीपिकासोबत उपस्थित राहण्यासाठी एनसीबीकडे विनंती केली आहे. कारण कधीकधी दीपिकाला घाबरल्यामुळे पॅनिक अटॅक येतात. त्यामुळे आपल्याला चौकशीदरम्यान उपस्थित राहु द्यावं, अशी मागणी त्यानं एनसीबीकडे केली आहे.
दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K हा कोडवर्ड समोर आला होता. त्यानंतर केलेल्या तपासामध्ये या नावांचा उलगडा झाला आहे. त्यानुसार D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे अभिनेत्री नम्रता शिरोडकर तर S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा ही नावं समोर आली आहेत.यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचे समोर आले आहे.