जळगाव (प्रतिनिधी) – पाचोरा येथील माजी आमदार दिलीप वाघ हे मुंबई येथील बैठक आटोपून येत असताना मुंबईजवळ फ्री वे मार्गावर अपघात झाला. अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळाली. यात दिलीप वाघ यांच्या वाहनाचे मात्र नुकसान झाले आहे.
गुरुवारी 24 रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आटोपून दिलीप वाघ हे शुक्रवारी 25 रोजी परतत होते. त्यावेळी सकाळी 11 वाजता त्यांच्या वाहनाला पुढच्या बाजूने जोरदार अपघात झाला. यात त्यांच्या वाहनांच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळाली.