एरंडोल:- शहरात बुधवार दरवाजा परिसर याठिकाणी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्ड वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


सदर आरोग्य कार्ड हे भारत सरकार व केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्या अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आरोग्याच्या सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरु केलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कार्डधारकाला विविध प्रकारच्या आजारांवर पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. एक भारत सशक्त भारत स्वस्थ भारत याप्रमाणे सर्वांनाच फायदा होईल.
सदर आरोग्य कार्ड वाटप कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र जमाती संपर्कप्रमुख अॅड. किशोर काळकर, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश सिंग परदेसी, भाजपा ओबीसी जिल्हाप्रमुख अशोक चौधरी, जन आरोग्य योजनेचे संयोजक प्राध्यापक सागर रायगडे, सुनील भैया पाटील, आबा चौधरी, नितीन वाणी, विशाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन योजनेचे संयोजन तथा भातखेडा ग्रामपंचायत सदस्य प्रा. सागर रायगडे यांनी केले आहे.







