नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ;-देशात सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने हैदोस घातला आहे. यात कोरोनावर कोणतेही प्रभावी औषध नसल्याने अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. ऑक्सिजन, बेड, औषधांचा मोठ्याप्रमाणात तुटवडा जाणवत आहे. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु देशात कोरोनाच्या तिसऱ्या धोका कमी जाणवणार आहे. कारण कोरोनावर आता अँटीबॉडी कॉकटेल औषध देशात लॉन्च झाले आहे.
स्विर्त्झलँडस्थित औषध कंपनी रॉशने हे अँटीबॉडी कॉकटेल औषध लॉन्च केले आहे. भारतातील सिप्ला कंपनी या अँटीबॉडी कॉकटेलची देशात वितरण करणार आहे. या अँटीबॉडी कॉकटेल औषधाची किंमत तब्बल ५९ हजार ७५० रुपये इतकी आहे. या औषधाची पहिली घेप भारतात दाखल झाली असून दुसरी थेप जून महिन्यात दाखस होईल.
कासिरीविमॅब आणि इमेडेविमॅब या दोन औषधांचे मिश्रण करून हे अँटीबॉडी कॉकटेल तयार करण्यात आले आहे. या दोन्ही औषधांची प्रत्येकी ६०० मिलिग्राम मात्रा वापरून अँटीबॉडी कॉकटेल तयार केले जात आहे. या अँटीबॉडी कॉकटेलमुळे विषाणूस शरीरातील कोशिकांत जाण्यापासून रोखले जाते. ज्यामुळे हा विषाणुला शरीरात पसरण्यासाठी प्रथिने मिळत नाही त्यामुळे त्याचा प्रसार जागीच रोखता येतो. एका औषधाच्या पाकिटातून दोन रुग्णांना उपचार करता येतात. सध्या भारतात या अँटीबॉडीची पाकिटे मिळणार आहेत. म्हणजेच भारतातील ४ लाख रुग्णांसाठी या अँटीबॉडी कॉकटेलचा वापर होणार आहे.