जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जळगाव क्रिटिकल केअर सोसायटीतर्फे sepsis जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. त्यामधे निमा असोसिएशनचे १०० डॉक्टर हजार होते.
सर्वप्रथम डॉ. कल्पेश गांधी यांनी मार्गदर्शन केले. डॉ लीना पाटील यांनी Sepsis guidinles आणि अँटिबायोटिक्सचा वापर कसा करायचा यावर मार्गदर्शन केले. डॉ. राहुल महाजन यांनी bacterial sepsis वर मार्गदर्शन केले. डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी Sepsis चे उपचार करताना फंगस कसे ओळखायचे आणि उपचार कसे करावे यावर मार्गदर्शन केले. डॉ. चेतन चौधरी यांनी दिअग्नोटिस्त टेस्टवर भर दिला. हा कार्यक्रम sepsis awareness म्हणून घेण्यात आला. आज भारतात हृदय विकरासोबत Sepsis मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे नक्कीच रुग्ण स्पेशालिस्टकडे लवकरगेला तर त्याचा मृत्युदर कमी होईल, असे तज्ज्ञ मान्यवरांनी सांगितले.
डॉ. अमित हिवरकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रविंद्र पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. सोनाली महाजन, डॉ. प्रकाश सुरवाडे, डॉ. पल्लवी राणे यांची उपस्थिती होती. निमा संस्थेचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र विसपुते आणि डॉ धनराज चौधरी यांच्यासोबत १०० इतर होमिओपॅथी आणि आयुर्वेद डॉक्टरांची उपस्थिती होती. चेअरमन डॉ. राजेश डाबी व सचिव डॉ. रविंद्र पाटील उपस्थित होते.