चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई
चाळीसगाव :– येथील बाजार समितीमध्ये चोरीच्या मोटारसायकली विक्रीस आल्याच्या खबरीवरून दोन जणांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली असून यांच्याकडून दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. बापुजी उर्फ लखन बळीराम राठोड आणि विवेक गणु आडे (दोघे रा. बेलखेडा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर) असे आरोपींची नावे आहेत.
दोन मोटार सायकल चोरटे त्यांच्या ताब्यातील चोरीच्या मोटार सायकली बाजार समितीमधे विक्रीसाठी आणणार असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. संदिप पाटील यांना मिळाल्यानुसार दोघा मोटार सायकलस्वारांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता सत्य बाहेर आले. दोघांच्या ताब्यातून पन्नास हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्या मोटार सायकली कल्याण ठाणे परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली .
पो.नि. संदीप पाटील, पोहेकॉ राहुल सोनवणे, पोहेकॉ अजय पाटील, पोना भुषण पाटील, पोना महेंद्र पाटील, पोकॉ विजय पाटील, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ रविंद्र बच्छे, पोकॉ पवन पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर गिते, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ समाधान पाटील, पोकॉ राकेश महाजन, पोकॉ मनोज चव्हाण आदींनी या तपासकामी सहभाग घेतला . चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ अजय पाटील व पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे करत आहेत.