चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – दागिन्यांसह रोकड असा सहा लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरांनी लंपास केल्याची घटना चाळीसगावात घडली होती. पोलिसांनी सात दिवसांत छडा लावून चार आरोपींना अटक केली त्यांच्याकडून ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अहमदनगरच्या पोलिस क्वार्टर येथील अंकीता प्रतीक पाटील (२५) आपल्या आईबरोबर २७ जानेवारीरोजी लग्नानिमित्ताने मालेगावाहून चाळीसगावात आल्या. एका पॅजो रिक्षात बसून हिरापूरला जाताना कपड्यांच्या बॅगेत ठेवलेले दागिने अज्ञाताने लंपास केले होते अंकीता पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात २८ जानेवारीरोजी भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास पोना नितीन आमोदकर करीत होते. ३ फेब्रुवारीरोजी ग्रामीण पोलीसांना खबऱ्यांकडून माहिती मिळताच सापळा रचून आरोपी अजय अंबादास घुमडकर (२३, रा. बस स्थानकामागे चाळीसगाव) , रविंद्र मल्लु घुमडकर (२३ , टाकळी प्र.चा चाळीसगाव) , विकी बाबू घुमडकर (२४ , रा. खरजाई रेल्वे गेट चाळीसगाव ) व नितेश शिवाजी पंच (२१ , रा. पंचवटी नाशिक) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २७,५०० रूपये रोकड व ५ लाख ८४ हजार ७०० रूपये किंमतीची १३ तोळ्याची सोन्याची लगड असा ६ लाख १२ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चारही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पो नि संजय ठेंगे, सपोनि रमेश चव्हाण, सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोउनि लोकेश पवार, पोहेकॉ युवराज नाईक, पोना नितीन आमोदकर, गोवर्धन बोरसे, शांताराम पवार, भूपेश वंजारी, प्रेमसिंग राठोड या पथकाने केली.