जळगाव ( प्रतिनिधी ) – सुटे मागण्याच्या बहाण्याने वृध्दाच्या हातातून साडे नऊ हजार रुपयांचे बंडल अज्ञात तरूण हिसकावून दुचाकीवरून पळून गेल्याची घटना रामेश्वर कॉलनीत घडली. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला
मेहरून येथील रहिवाशी भास्कर लाडवंजारी (वय-६७) हे पत्नी व मुलासह वास्तव्याला आहेत . त्यांचे रामेश्वर कॉलनीतील लक्ष्मी नगरात हार्डवेअरचे दुकान असून दुकानाच्या बाजूला त्यांचा मुलगा रघुनाथ लाडवंजारी याचे पंक्चर काढण्याचे दुकान आहे. ११ नोव्हेंबररेाजी नेहमीप्रमाणे भास्कर लाडवंजारी यांनी दुकान सकाळी उघडले. त्यानंतर ते खराब झालेले दुचाकीचे लॉक घेण्यासाठी पायी जात असतांना त्यांच्याजवळ एक अनोळखी ४० वर्षी तरूण दुचाकीवर आला. त्याने सांगितले की, बाबा तुम्हाला दुचाकीने हार्डवेअर दुकानावर सोडून देतो भास्कर लाडवंजारी दुचाकीवर बसले थोड्या वेळानंतर तरूणाने दुचाकी थांबवून दोन हजाराची नोट काढून सुटे मागितले सुटे देण्यासाठी भास्कर लाडवंजारी यांनी खिशातील १०० रूपयांच्या नोटांचे बंडल काढले. त्याचवेळी त्या तरुणाने त्यांच्या हातातील ९ हजार ५०० रूपयांचे बंडल हिसकावून दुचाकीने पळ काढला. भास्कर लाडवंजारी यांनी रविवारी दुपारी अनोळखी तरूणाविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला