जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात शिवाजीनगरातील भुरे मामलेदार बगीच्याजवळ कारचे कव्हर जाळणाऱ्या दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक शरद चौधरी ( वय 34 रा. कोल्हे नगर ) हे मार्केटिंगचा व्यवसाय करतात. मंगळवारी दुपारी शहरातील शिवाजीनगर भागात भुरे मामलेदार बगीच्या जवळील प्लॉट नंबर 3 जवळ त्यांनी त्यांची एमएच १९ सीएफ १७२३ क्रमांकांची कार पार्किंग करून कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी शिवाजीनगरातील अक्षय अकोलकर आणि त्याच्यासोबत असलेल्या अज्ञात व्यक्तीने कारचे कव्हर जाळून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला. दीपक चौधरी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अक्षय अकोलकर व अज्ञात व्यक्तीवर सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना करुणासागर जाधव करीत आहे.