जळगाव (प्रतिनिधी) : एक वर्षापासून माहेरी पाठवून दिलेल्या पत्नीला पतीने मोबाइलवर ‘तलाक’ दिला. ट्रीपल तलाकप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध सोमवारी दिनांक २२ जुलै रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर परिसरातील महिलेचे आसिफ दगा पटेल (रा. वाकवडजी, ता. भडगाव) याच्याशी सन २०२१ मध्ये लग्न झाले. त्यानंतर सासरचे मंडळी विवाहितेला त्रास देऊ लागले व एक वर्षापूर्वी तिला माहेरी पाठवून दिले. दिनांक १८ जुलै २०२४ रोजी या विवाहितेला पतीने मोबाइलवर संपर्क साधून ‘मै तुझे तलाक देता हूं’ असे तीन वेळा म्हणत नाते संपल्याचे सांगून मोबाइलवर बोलणे कट केले होते.
यामुळे विवाहितेने शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरून पतिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









