जळगाव ( प्रतिनिधी ) – विवाहितेने माहेरहून १ लाख रूपये आणावे, यासाठी शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी परिसरातील माहेर असलेल्या सिमा समाधान पाटील (वय-३०) यांचा विवाह गुजरात राज्यातील बारडोली येथील समाधान चिंधू पाटील यांच्याशी झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही महिने चांगले गेले. त्यानंतर समाधान पाटील हा दारूच्या नशेत विवाहितेला शिवीगाळ करून लागला. आणि माहेरहून तू १ लाख रूपये आणले नाही तर मी तुला वागवणार नाही अशी धमकी दिली. सासू आणि ननंद यांनी पैशासाठी तगादा लावला होता. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या . विवाहितने २० मे रोजी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती समाधान पाटील, इंदूबाई पाटील, साधना पाटील ( सर्व रा. मरीमाता मंदीर, बारडोली, गुजरात ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहेत .