पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील एका तरुणीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवून त्याचा व्हिडिओ व्हाटसअॅपवर व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने पीडित तरुणीच्या मामेभावासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या मामेभावाने गोड बोलून कधी तिला घरी नेऊन तर कधी फर्दापूर येथील लॉजवर नेऊन बळजबरीने तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. फर्दापूर येथील लॉजवर संबंध करतानाचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाइलमध्ये तयार केला. तो व्हीडिओ सर्व मित्र परिवाराच्या व्हाट्अॅप ग्रुपवर व्हायरल केला. याची चर्चा होऊ लागताच पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी तिच्या मामेभावाच्या आई-वडिलांकडे जाब विचारला. त्यावर त्यांनी पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली.
एका महिलेसह तिघांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७६ (२) (एफ) (एन),३५४ (ए) (आय),५०६ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील ६१ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन लक्ष्मणराव नजन पाटील हे करीत आहेत.