जळगाव (प्रतिनिधी ) – दारू पिऊन पोलिसांचा ११२ क्रमांक डायल करून पोलीस खरेच येतात का ? अशी मजाक एका व्यक्तीला चान्गलीच महागात पडली असून पोलिसांनी फोन करणाऱ्याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनराज कडु भिल रा. डांगर ता. अमळनेर याने डायल ११२ वर कॉल करून वाद होत असल्याची तक्रार दिली होती. पोलीस कर्मचारी मिलींद अशोक भामरे , पोना भामरे , वाहन चालक पोहेकाँ मधुकर पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली असता धनराज भिल हा मद्यधुंध अवस्थेत आढळून आला . तसेच त्याने पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केली .
तसेच तो सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करत असतानां मिळुन आला . धनराज कडु भिल रा. डांगर याचें डांगर ता. अमळनेर याचे विरुध्ध भादवि कलम १८२ सह महा. दारुबंदी अधिनियम ८५(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.