जळगाव (प्रतिनिधी) – शहरातून एकाची १५ हजार किमतीची दुचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदुम्न निवृत्ती बोरसे (वय-२३) रा. जुना असोदा रोड, श्रीराम कॉलनी जळगाव हे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. यांच्याकडे त्याची मालकीची (एमएच १९, बीडी ८१००) दुचाकी असून ते खाजगी नोकरीसाठी त्याचा वापर करतात. १७ जानेवारी रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची उघडकीला आले आहे. त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता त्यांना दुचाकी कुठेही आढळून आले नाही. शुक्रवारी 21 जानेवारी रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल परेश जाधव करीत आहेत.