भुसावळ शहरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील बांधकामासाठी लागणारे २७ हजार ५०० रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेल्याची घटना शनिवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. या गुन्ह्यात पोलीसांनी दोन जणांना अटक केली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष विनोदकुमार जाधवानी (वय ३४ रा. दत्तधाम कॉलनी, जळगाव) हा तरूण बांधकाम व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे भुसावळ शहरातील डब्ल्यू एस एस सी स्कूल येथे बांधकामाचे काम सुरू असल्याने काही साहित्य त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. दरम्यान दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता सर्व साहित्य जागेवर व्यवस्थित होते. मध्यरात्री संशयित आरोपी बाबर समशेर शेख (वय २५ रा. रेल्वे फिल्टर हाऊस, भुसावळ) यांच्यासह एकाने (नाव माहित नाही) या दोघांनी बांधकामासाठी लागणारे लोखंडी प्लेटा, लोखंडी कैच्या आणि लोखंडी जॅक असे एकुण २७ हजार ५०० रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेले.
हा प्रकार दुसऱ्या दिवशी शनिवारी दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आला. बांधकाम व्यावसायिक आशिष जाधवानी यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार दुपारी ४ वाजता पोलीस ठाण्यात संशयित आरोपी बाबर समशेर शेख वय २५ रा. रेल्वे फिल्टर हाऊस भुसावळ यांच्यासह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अनिल सुरवाडे हे करीत आहे.