स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
एरंडोल (प्रतिनिधी) : गावठी पिस्तूल ताब्यात बाळगणाऱ्या २० वर्षीय तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. त्यास अटक करण्यात आली आहे.
एरंडोल शहरातील केवडीपुरा भागात राहणाऱ्या प्रविण रविंद्र बागूल (२०) या तरुणाकडे प्लास्टिक मूठ असलेले २५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास एरंडोल शहरातील बीएसएनएल कार्यालयानजीक पिंप्री रोडलगत ही कारवाई करण्यात आली. प्रविण रविंद्र बागुल याच्या ताब्यात गावठी पिस्तूल, चोरीची दुचाकी व मोबाईल आढळल्याने त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली.