एलसीबीच्या पथकाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल भानू येथे झालेल्या किशोर सोनवणे खूनप्रकरणी हितेश संजय बागुल (दिनांक २६, रा. पिंप्राळा) याला बुधवारी ३१ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले. त्याच्याकडून एक पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.
कालिंका माता मंदिर परिसरातील एका हॉटेलमध्ये दिनांक २२ मे रोजी किशोर सोनवणे याचा खून झाला होता. यात सात जणांना यापूर्वीच अटक करण्यात आले होते. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावंतवाडीनजीक दोन जणांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन अव्हाड यांच्या मार्गदर्शनात पोउनि गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, लक्ष्मण पाटील, अक्रम शेख यांनी हितेश बागुल याला बुधवारी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.