भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील फुलगाव येथील ओम टायर दुकानातून ४६ हजार रुपये किमतीच्या चार बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवारी दिनांक १८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भूषण देविदास पाटील (वय-३९, रा. सरस्वती नगर, वरणगाव) यांचे भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे ओम टायर हाऊस दुकान आहे. या दुकानात त्यांनी त्यांच्या मालकीच्या चार बॅटऱ्या ठेवण्यात आलेल्या होत्या. दरम्यान ४६ हजार रुपये किमतीच्या या चार बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी दिनांक १८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली आहे.
याप्रकरणी भूषण पाटील यांनी सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर पाटील करत आहे.