जळगाव;-येथील पंकज गोपाल देशमुख (वय ३३ रा. विमल कुंज, दत्त कॉलनी जळगाव ) हे त्यांच्या दुचाकीवरून गुरुवार २२ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता रॉयल पॅलेससमोरुन जात असतांना त्यांना चारचाकीच्या धडक दिल्याने ते जखमी झाले होते. याप्रकरणी आज शनिवारी अज्ञात कारचालकाविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज शनिवारी पंकज देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात एम.एच.१९ सी.एफ २९२८ या क्रमाकांच्या चारचाकीवरुन अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशील पाटील हे करीत आहेत.








