रावेर तालुक्यात शेजाऱ्यांच्या सतर्कतेने घटना उघडकीस
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका प्रतिष्ठित गावामध्ये मजुरी करणाऱ्या कुटुंबात बापच हैवान झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. स्वतःच्या १३ वर्षे मुलीवर त्याने बलात्कार केला. तिच्या आरडाओरडामुळे शेजारच्या नागरिकांनी धाव घेत सदर मुलीची सुटका केली. शेजाऱ्यांनी सदर बापाला चोप दिला. यामुळे घाबरून तो गावातून पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.
रावेर तालुक्यात प्रतिष्ठित गावांमध्ये एका शेतमजुर् कुटुंबामध्ये ही घटना घडली आहे. कुटुंबातील पीडित मुलीची आई ही सकाळी एका शेतामध्ये कामाला गेली होती. त्यावेळेला घरात पीडित मुलगी आणि तिचे वडील एवढेच घरात होते. सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याने अतीप्रसंग करत अत्याचार केला. दरम्यान पीडित मुलीने आरडा ओरडा सुरू केला. शेजारी राहणाऱ्या परिवाराने आरडाओरडा ऐकताच घराकडे धाव घेतली.
सदर मुलीची पित्याच्या ताब्यातून सुटका केली. सदर बापाला शेजाऱ्यांनी चोप दिला. त्यामुळे सदर बाप् गावातून फरार झाला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पीडित मुलीच्या जबाबावरून संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनी विनोद खांडबहाले करीत आहेत.