जळगावातील एमआयडीसी भागात चोरट्यांचा उच्छाद
जळगाव (प्रतिनिधी) : येथील एमआयडीसीतील जगवानी नगरातील दुकानाचे शटर उचकावून आत प्रवेश करत दुकानातून १ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे जुने स्क्रॅप्ट कॉपर व वायर असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दि. २७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जून जयाजी अवचर (वय ५२, रा. सिध्दीविनायक शाळेजवळ, अयोध्या नगर) यांनी फिर्याद दिली आहे. जळगाव एमआयडीसीतील भारत पेट्रोलीयमी रोडवरील जगवानी नगरच्या समोर दुकान नंबर ४ आहे. दि. १६ एप्रिल रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरचे चैनल गेट तोडून आत प्रवेश केला. दुकानातून १ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे जुने स्क्रॅप आणि वायर असा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अर्जून जयाजी अवचर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात सोमवारी २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.