• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नागरिकांनी कोवीन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक – जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) ;- राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरीकांना मोफत कोरोना लस देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात १ मे, २०२१ पासून लसीकरणास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसात जिल्ह्यातील २ हजार ८४१ नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी या वयोगटातील नागरीकांनी कोविन ॲपवर नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर नागरीकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात १६ जानेवारी, २०२१ रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला. त्यानुसार शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि ४५ वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती व ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. तर १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले असून लसीच्या उपलब्धतेनुसार जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयात नागरीकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन लस घेण्यासाठी पुढे येत आहे.

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस महत्वपूर्ण असल्याने राज्य शासनाने १ मे पासून राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरीकांचे मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या नागरीकांसाठी जिल्ह्यात रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, जळगाव शहर महानगरपालिकेचे शाहू महाराज रुग्णालय व नानीबाई आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद अशी एकूण पाच केंद्र सुरु केली आहेत. या पाच केंद्रावर दैनंदिन १०० पुरुष व १०० महिलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील टप्प्यात ही केंद्र वाढवण्याचे नियोजन राज्यस्तरावर सुरू आहे. जिल्ह्यात या केंद्रावर पहिल्या दिवशी (१ मे) ४११, दुसऱ्या दिवशी (२ मे) ६९५, तिसऱ्या दिवशी (३ मे) ७६९ तर चौथ्या दिवशी (४ मे) ९६६ व्यक्ती असे एकूण २ हजार ८४१ व्यक्तींना लस देण्यात आली आहे.

१८ ते ४४ वयोगटात मर्यादित स्वरूपात व फक्त आगाऊ ऑनलाइन नोंदणीद्वारे लसीकरण सुरू आहे, यात लसीकरण केंद्रावर नोंदणीचा पर्याय उपलब्ध नाही. यामुळे नोंदणी व लसीकरण केंद्रावर या वयोगटातील नागरिकांनी संयम बाळगून आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन करणेत येत आहे. याशिवाय नियमित शासकीय केंद्रांवर ४५ हुन अधिक वय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण सुरू राहणार आहे. यात दुसऱ्या डोससाठी पात्र नागरिकांना वेगळा कोटा देण्यात येत आहे.

जिल्ह्यात तीन लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४८ हजार ९९८ नागरीकांना कोरोना लसीचा पहिला डोस तर ५९ हजार १०८ नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि सर्वसामान्य नागरीकांचा समावेश आहे. जिल्ह्याला जास्तीत जास्त लसीचा साठा मिळावा यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोविड-१९ नोडल अधिकारी डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.


 

 

Previous Post

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८ दुकानांवर ‘सील’ची कारवाई

Next Post

महापौरांकडून शिवकॉलनी, गुरुदत्त कॉलनीतील रस्त्यांच्या कामाची पाहणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महापौरांकडून शिवकॉलनी, गुरुदत्त कॉलनीतील रस्त्यांच्या कामाची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon