जळगाव (प्रतिनिधी ) – डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, ३० रोजी सकाळपासून राजकीय वर्तुळासह सामाजिक, शैक्षणिक संस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. दिवसभर केक कटिंग समारोहासह सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांनी डॉ.वैभव यांना शुभेच्छा देण्यात आल्यात. कोविडकाळात डॉ.वैभव पाटील यांनी केलेल्या सेवेचे कौतुक करुन आपल्यासारखे हृदयरोग तज्ञ आमच्यात आहे, म्हणून आम्ही निश्चिंत आहोत, अशा शब्दात मान्यवरांनी कौतुकाचा वर्षावही केला.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांचा आज वाढदिवस… त्यानिमित्त गोदावरी अभियांत्रिकी, जीआयएमआर, लॉ कॉलेज, फॅशन टेक्नॉलॉजी, संगीत, गोदावरी स्कूल, भुसावळ-सावदा येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, गोदावरी नर्सिंग कॉलेज, डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी, होमिओपॅथी, आयुर्वेद महाविद्यालयातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी पाटील, अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, श्री.अनिल पाटील, सौ.अलका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. गोदावरी फाऊंडेशन अंतर्गत येणार्या महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापक वृंद वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. विजयकुमार यांनी डॉ. वैभव पाटील यांचा फाऊंडेशनच्या माध्यमातून करत असलेल्या कार्याचा उल्लेख केला. फाउंडेशनमध्ये कार्यरत असलेले विविध प्रकल्प, त्यातील सहभाग याबाबत सांगून डॉ.वैभव यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी फाऊंडेशनची वाटचाल अजुन वृद्धींगत होईल असे सांगितले. व त्यांना वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर डॉ. प्रशांत वारके यांनी डॉ. वैभव पाटील यांच्या कर्तुत्वाचे दाखले देताना त्यांची काम करण्याची पद्धत व त्यांची क्षमता याबद्दल सांगितले. तसेच गोदावरी फाउंडेशन नविन उच्चांक गाठेल असा विश्वासही व्यक्त केला. याप्रसंगी उत्सवमुर्ती डॉ. वैभव पाटील यांनी त्याच्या भाषणात सर्वांच्या शुभेच्छा स्विकारून आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे फाऊंडेशनच्या भरभराटीमध्ये प्रत्येक व्यक्तीचा वाटा आहे व अशाच प्रकारे प्रत्येक व्यक्तीने साथ दिली तर फाउंडेशनचा विकास अजून भरभराटीने होईल असे मत वक्त केले. व तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हे सर्व काही शक्य होते असे सांगितले. त्यानंतर डॉ.उल्हास पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले.तसेच पुढेही सर्व फाउंडेशन अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचा सहभाग अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये नियमित असेल व फाउंडेशन मधील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग यामुळेच फाउंडेशन ची भरभराट होते असे नमूद केले. तसेच डॉ. वैभव पाटील यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सांगितले.
केक कटिंगप्रसंगी गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, डॉ.प्रशांत वारके (संचालक, गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च), प्रा.निलीमा चौधरी (प्राचार्य, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव) प्रा.अॅड.सतिष गाडगे (प्राचार्य, डॉ.उल्हास पाटील लॉ कॉलेज), प्रा.एम.पी बाऊस्कर (प्राचार्य, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ सायन्स), प्रा. पुनीत बसन (प्राचार्य, हरीभाऊ जावळे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नोलॉजी), भुसावळ स्कूलच्या प्राचार्या अनघा पाटील, सावदा स्कूलच्या प्राचार्या भारती महाजन, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्या डॉ.मौसमी लेंढे, संचालक शिवानंद बिरादर, रजिस्ट्रार प्रविण कोल्हे, मेट्रन संकेत पाटील, किर्ती पाटील, मनिषा खरात, कृषी महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ.एस.एम.पाटील, डॉ.अशोक चौधरी, प्राचार्य डॉ.पूनमचंद सपकाळे, प्राचार्य डॉ.शैलेश तायडे, हॉर्टिकल्चरचे संचालक सतीश सावके, फिजीओथेरपी प्राचार्या डॉ.जयवंत नागुलकर, होमिओपॅथीचे प्राचार्या दिलीप पाटील, आयुर्वेदच डॉ.हर्षल बोरोले यांच्यासह डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ यांची उपस्थीती होती.
यानंतर सर्व महाविद्यालयामार्फत वेगवेगळ्या केक कटींग चे सेलेब्रेशन करण्यात आले. तसेच प्राध्यापक, अधिकारी वर्गांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. अशाप्रकारे सर्वच शैक्षणिक संस्थांमध्ये अतिशय आनंदी वातावरणातडॉ. वैभव पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्ञानदा कोल्हे, प्रा. शफिक अन्सारी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. हर्षल चौधरी यांनी केले.