नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने केवळ एक डोस पुरेसा असलेल्या स्पुटनिक लाइट या कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. डीसीजीआयच्या समितीने या लसीचा भारतात आपत्कालीन वापर करण्याबाबत शिफारस केली होती. ही लस भारतातील कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील नववी कोरोना लस असेल. मात्र नऊही लसींमध्ये स्पुतनिक लाइट ही एकमेव सिंगल डोसवाली लस आहे.
या लसीच्या वापरामुळे कोरोना महामारीविरोधातील सामूहिक लढ्याला आणखी बळकटी मिळेल, असे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी केले आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालली आहे. मात्र नव्या व्हेरिएंटच्या शिरकावाची भिती कायम आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. ही एकच डोस असलेली लस 93 .5 टक्के प्रभावी व ‘बूस्टर डोस’ म्हणूनदेखील प्रभावी आहे.