जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज २८१ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे २१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – ७२, जळगाव ग्रामीण-१४, भुसावळ-३२, अमळनेर-१५, चोपडा-२०, पाचोरा-१६, भडगाव-००, धरणगाव-२२, यावल-०२, एरंडोल-०६, जामनेर-०८, रावेर-०५, पारोळा-३५, चाळीसगाव-१५, मुक्ताईनगर-१५, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०४ असे एकुण २८१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४८ हजार ९९९ पर्यंत पोहचली असून १ लाख ४२ हजार ७८२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५८४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ३६३३ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.