जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत असून आज जिल्ह्यात १५९ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर ५२१ रुग्ण घरी बरे होऊन परत गेले आहे. गेल्या २४ तासात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर -९, जळगाव ग्रामीण- १, भुसावळ-११, अमळनेर-४, चोपडा-१, पाचोरा-१२, भडगाव-७, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-२, पारोळा-१, चाळीसगाव-९७, मुक्ताईनगर-२ आणि बोदवड-० असे एकुण १५९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.