नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- सध्या कोरोनाबाधित रुग्णांचा वेग मंदावला असून गेल्या दोन महिन्यात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रूग्णांचा रिकव्हरी रेट 93. 67 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जास्त आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 1.14 लाख नव्या रुग्णांची भर पडली. त्यापैकी 2600 हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 1.20 नवे रुग्ण आढळून आले होते. तेव्हा 3380 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशात सद्यस्थितीत कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 लाखांहून कमी आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेली आकडेवारी रविवार ( 06 जून 2021), सकाळी 8 वाजता जारी केलेली कोरोना रुग्णांची आकडेवारी
गेल्या 24 तासात एकूण नवीन प्रकरणे- 1,14,460
गेल्या 24 तासात पूर्णपणे बरे झालेले रुग्ण- 1,89,232
गेल्या 24 तासात एकूण मृत्यू – 2677
देशात संक्रमित कोरोनाची एकूण संख्या – 2,88,09,339
देशात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या – 2,69,84,781
देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या – 3,46,759
भारतात सध्या कोरोनाची एकूण अॅक्टिव्ह प्रकरणे – 14,77,799
एकूण लसीकरण – 23,13,22,417
या 5 राज्यांमध्ये सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण
तमिळनाडू- 21,410
केरळ- 17,328
कर्नाटक- 13,800
महाराष्ट्र- 13,659
आंध्र प्रदेश- 10,373