११ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह ; दोन रिजेक्ट तर ७ जणांचे तपासणी रिपोर्ट बाकी
जळगाव ;– येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आज नव्याने ४ संशयित रुग्ण दाखल झाले असून त्यांच्या उपचार करण्यात येत आहे . तसेच आतापर्यंत २० रुग्नांची तपासणी करण्यात आली असून यापैकी ११ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत . दोन रिजेक्ट झाले असून ७ जणांचे तपासणी रिपोर्ट अद्याप आलेला नाही .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , आज वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेले चारही रूग्ण पुरुष असून पहिला रुग्ण हा जर्मनीहून १७ रोजी आला होता. प्रवास करून आल्यानंतर आज तो रुग्ण दाखल झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील सावखेडा येथील बहरीन येथून प्रवास करून १७ रोजी जळगाव येथे आला होता. अमेरिकेत शिकण्यासाठी गेलेला म्हसावद येथील तरुण १४ रोजी आपल्या घरी परतला होता. चौथा संशयित रुग्ण मुंबई एअरपोर्टवर कामाला आहे. मूळचा यावल येथील रहिवासी असून आपल्याला पूर्ण झाल्या आहे की नाही हे तपासण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. रविवारी होणाऱ्या जनता कर्फ्यूसाठी प्रशासन सज्ज असल्याचेही सूत्रांनी सांगितले .