नवी दिल्ली ;- (वृत्तसंस्था ) ;- को गेल्या 24 तासात देशात 84, 332 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. 4002 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला आहे. 1 लाख 21 हजार 311 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. आकडेवारीनुसार, देशात सध्या 40 हजार 981 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. याआधी 1 एप्रिलला देशात 81 हजार 466 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
शनिवारी (12 जून 2021) सकाळी 8 वाजता मंत्रालयाने कोरोनाचे आकडेवारी जाहीर केले.
गेल्या 24 तासात एकूण नवे रुग्ण – 84,332
गेल्या 24 तासात कोरोनामुक्त रुग्ण- 1,21,311
गेल्या 24 तासात एकूण मृत्यू – 4,002
देशामध्ये संक्रमित कोरोनाची एकूण संख्या – 2,93,59,155
देशात आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या – 2,79,11,384
देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या – 3,67,081
भारतात सध्या कोरोनाची एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 10,80,690
एकूण लसीकरण – 24,96,00,304
कोरोना चाचण्यांनी देशात 37 कोटी 62 लाखांचा आकडा गाठला आहे. देशातील कोरोना मृत्यूदर 1.24 टक्क्यांवर पोहोचला असून रिकव्हरी रेट (Recovery Rate) 95 टक्क्यांहून जास्त आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येचं प्रमाण 4 टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे. अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला असून एकूण बाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.