जळगाव (प्रतिनिधी) :- राहुल गांधी विचार मंच अमळनेर तालुका आणि अमळनेर शहर अल्पसंख्याक कमिटी पदाधिकारींना जिल्हा अध्यक्ष डॉ. रहेमान सुभान खाटीक पाडसेकर यांच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यात राकेश गबा पवार- युवक तालुकाध्यक्ष, श्रीकांत हिम्मत गव्हाणे पाडसे – उपाध्यक्ष, भागवत ओंकार बाविस्कर- सचिव, श्यामकांत निळकंठ पवार- संघटक तसेच शहर अल्पसंख्याक कमिटी- काशिफ इस्माईल खान पठाण- युवक अध्यक्ष, फिरोज हुसैन शेख- उपाध्यक्ष, बशीर खा नासिर खा पठाण- संघटक यांची नियुक्ती झाली.
सदर पदाधिकारींची गेल्या आठवड्यात महाराष्ट्र प्रभारी दिपाली मिसाळ, प्रदेशाध्यक्ष स्वप्नील बनशींगे, आणि महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमोल राखपसारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. रहेमान सुभान खाटीक जिल्हा अध्यक्ष यांच्या आदेशानुसार नियुक्त्या झालेल्या आहे.
यावेळी कांग्रेस पक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न कराल अशी अपेक्षा नवनियुक्त पदाधिकारीं कडून जिल्हा अध्यक्ष डॉ. रहेमान खाटीक यांनी बोलतांना व्यक्त केली.