नवी दिल्ली – खासदार राहुल आणि प्रियंका गांधी आज हाथरस सामुहिक बलात्कारातील पीडितेच्या कुटूंबीयांची भेट घेण्यासाठी जाणार आहे. आज दुपारच्या नंतर ते हाथरसला रवाना होणार आहे. दोन दिवसांपूर्वीच ते दिल्लीहून हाथरसकडे निघाले होते मात्र, यूपी पोलीसांनी त्यांना यमुना एक्सप्रेस वे वर धक्काबुक्की करत त्यांना अटक करण्यात आली होती.
योगी सरकार हाथरस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच विपक्ष आणि मीडियाला हाथरसमध्ये जाण्यास बंदी घातल्यामुळे हे प्रकरण आणखीणच चिघलळे आहे. दरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पीडितेच्या कुटूंबीयांची भेट घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. त्यानंतर आज ते पुन्हा हाथरससाठी रवाना होणार असून, पीडितेच्या कुटूंबीयांची भेट घेणार आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच राहुल आणि प्रियंका हाथरसकडे निघाले होते, मात्र त्यांना पोलीसांनी अडवून त्यांच्यावर धक्काबूक्की सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर राहुल यांनी गांधी जयंती दिवशी ट्विट केले होते की,’ मी ह्या जगात कोणालाही घाबरत नाही, मी न्याय सोबत चालणारा माणूस आहे, मी असत्यावर सत्यातून यश प्राप्त करेल.’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते. आणि आज ते पीडितेच्या कुटूंबीयांना भेटण्यासाठी जाणार आहे.