पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर घडली घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील तुराट खेड्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर एका दुचाकीचालकास कंटेनरने धडक दिल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला असून जळगाव येथे उपचार घेत आहे. त्याच्या जबाबावरून पारोळा पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जीजाबराव रामलाल पाटील (वय ४२ वर्ष, रा. तुराटखेडा) यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कंटेनर क्र (जीजे-१२-बीएक्स-२९२६) वरील चालक याने दि. २ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास तुराटखेडा ते मराठखेडा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग ५३ वर बजरंग टी समोर दुचाकीस्वार कामानिमीत्ताने जात असताना त्यांना धडक दिली. तुराटखेडे ते मराठखेडे यांच्या मधोमध रस्त्यावर थांबलेला कंटनेर अचानक पुढे मोटार सायकलने मराठखेडा येथे जात असतांना न पाहता निघाला व त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीस्वार व्यक्तीला डोक्याला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली म्हणून पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तपास डॉ. शरद पाटील हे करीत आहेत.









