पारोळा ;- तालुका काँग्रेस कमिटीकडून राहुल गांधी यांच्या जन्मदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी कायदा बिल पास केलेला आहे त्या बिलाची होळी करण्यात आली व तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या . जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात पारोळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी पारोळा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय लटकन पाटील जिल्हा उपाध्यक्ष रामराव पाटील छबिलदास ठाकरे किसान सेलचे अध्यक्ष प्रमोद भिमसिंग पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव महाजन प्रकाश वानखडे समाधान निकाळजे शंकर वाघ खबरी मिस्तरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.