जळगाव ( प्रतिनिधी ) ;- महाराष्ट्र काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त गेंदालाल मिल परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन गोकुळ चव्हाण (यंग ब्रिगेड महानगर प्रमुख काॅग्रेस सेवादल) यांच्यातर्फे करण्यात आले, तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपस्थितांना वृक्ष रोपाचे वाटप करून त्याचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी निलेश भोसले, नितिन चंदनशिव, बापु गुजर, विलास निकम, राहुल वाघ, सुनिल एकसिंगे, सागर चव्हाण, दिलीप सुरवाढे, शांताराम भारुडे, भुषन जाधव,नितिन शीसोदिया आदि उपस्थित होते.