जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लढवली जाणार ? , या प्रश्नाचे उत्तर आता जवळपास मिळाले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या सर्वपक्षीय पॅनलच्या बैठकीत चर्चा फिस्कटली आहे काँग्रेसने भाजपसोबत जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिल्याने आजच्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही
कोणत्याही निर्णयाविना ही सर्वपक्षीय बैठक आटोपली काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची मांडलेली भूमिका आजही कायम असल्याचे सांगितले
उद्या पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती भाजप, शिवसेना नेत्यांनी दिली असली तरी आज या बैठकीनंतर आमच्या भूमिकेत काहीच बदल झाला नसल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी सांगितले सर्वपक्षीय पॅनल व्हावे म्हणून आधी सक्रिय भूमिका घेतलेले आमदार शिरीष चौधरी हेही यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यासोबत उपस्थित होते . आजच्या बैठकीत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, बैठकीत फक्त चहापान आणि नाश्ता झाल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली
पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन हे माध्यमांशी न बोलताच निघून गेल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले .
सर्वपक्षिय बैठक शहरातील अजिंठा विश्राम गृहात झाली आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी भाजपला थेट विरोधाची भूमिका जाहीर केल्याच्या पार्शवभूमीवर या बैठकीत आमदार गिरीश महाजन आता काय बोलतात याबद्दल सगळ्यांची उत्सुकता वाढली होती
आमदार गिरीश महाजन यांच्यासह शिवसेनेकडून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. कीशोर पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ.सतिष पाटील , काँग्रेसकडून आ. शिरीष चौधरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार डी जी पाटील या बैठकीत सहभागी झाले होते.