चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील हातगांव येथे एका तरुणाने कौटुंबिक वादातून गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी घडली आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संदीप भीमराव निकम (वय २८, रा. हातगांव ता. चाळीसगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, भाऊ, पत्नी यांचेसह राहत होता. नाशिक येथे महापालिकेच्या बससेवेत वाहक (कंडक्टर) म्हणून तो नोकरी करीत होता.(केसीएन)दरम्यान, शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी घरी कोणी नसताना त्याने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले.
प्रसंगी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. कौटुंबिक वादातून त्याने आत्महत्या केली असावी अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. यामुळे हातगांव येथे शोककळा पसरली आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.