जळगावात ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) – येथील एमआयडीसी भागातील एका कंपनीतून ८६ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची चोरी करणाऱ्यास पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. सदरची चोरी ही त्याचा अल्पवयीन साथीदारासह त्याने केली होती. याप्रकरणी चोरट्याकडून ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जळगाव एम.आय.डी.सी. डी. १२ सेक्टर मधील रायेटेक्स फार्मसीटीकल फॅक्टरीतील स्टोअरमधून दि. ०७ ते २० जुलै रोजी ८६,५००/- रु किंमतीचे एस.एस. २.५ ली. मापाची मिल्क कॅन २०० रु.नग, एस.एस. स्पेअर लिड ५ लीटर मापाची १०० रु.नग प्रमाणे एकुण ७५५ नग, १ एच.पी.ची पाण्याची मोटार असे साहित्य कंपनीतुन चोरी झाले होते. प्रशांत दिलीपकुमार कोठारी (वय ५० वर्ष, रा. ५३ विसनजीनगर, होमगार्ड ऑफीस जवळ, जिल्हापेठ) यांनी २० रोजी फिर्याद दिल्याने एमआयडीसी पो.स्टे. जळगाव येथे अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.