राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : राज्य सरकारने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशभरातील विविध राज्यांना तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ असणाऱ्या अधिकाऱ्यांची किंवा गृह कॅडर असलेल्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदलीचे आदेश दिले होते. त्यानुसार विविध अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.
जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकीरी अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तसेच आयएएस अधिकारी संजय मीना यांची नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे महानगर आयुक्त म्हणून नियुक्त केली आहे. सध्या इथे मनोजकुमार सूर्यवंशी कार्यरत आहेत. तर बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची धुळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली केली आहे. सध्या इथे शुभम गुप्ता हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शुभम गुप्ता हे जळगाव जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून येत आहेत.