एरंडोल-पारोळा महामार्गावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जालना येथून लोखंडी आसारी भरलेला ट्रक महामार्गावर नादुरुस्त झाला. या ट्रकला भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात ट्रक क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे. एरंडोल-पारोळा महामार्गावर एम.जी. शहा पेट्रोलपंपासमोर ही घटना गुरुवार दिनांक ८ रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली. एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर भास्कर गुंजाळ (वय ४२, रा. ताड पिंपळगाव, ता. कन्नड) असे मृत क्लिनरचे नाव आहे. ज्ञानेश्वर गुंजाळ हे गेल्या पाच वर्षापासून धुळे येथील मसुद अब्दुल्ला शेख यांच्या मालकीचा ट्रक (क्रमांक एमएच १८ बीए ४७९५) या ट्रकवर क्लिनर म्हणून कामाला होते.(केसीएन) ट्रकमध्ये जालना येथुन लोखंडी आसारी भरला. हा माल उतरविण्यासाठी हा ट्रक साक्री (जि.धुळे) येथे जात होता. महामार्गावरुन धावत असताना ट्रक एम.जी. शहा पेट्रोलपंपासमोर गुरुवारी नादुरुस्त होवून बंद पडला. चालकाने हा ट्रक पंपाजवळ महामार्गाच्या कडेला थांबविला.
त्यानंतर ट्रक चालक शेख युसुफ शेख मुस्लीम हे मॅकेनिकलला आणण्यासाठी धुळे येथे गेले. या ट्रकजवळ ज्ञानेश्वर गुंजाळ थांबले होते. त्याचवेळी महामार्गावरुन भरधाव वाहनाने ट्रकला धडक दिली. (केसीएन)या अपघातात ज्ञानेश्वर गुंजाळ यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविला. या प्रकरणी गणेश भास्कर गुंजाळ यांच्या तक्रारीनुसार एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल जुबेर खाटीक हे करीत आहेत.