जळगाव – एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच कोव्हीड १९ घोषित रुग्णालयातील निम्म्याहून अधिक डॉक्टर्स सेवा न पुरविता लाखोंचा पगार लाटत असून यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेला जिल्हा रेड झोन मध्ये जाऊन संबंधितांच्या हलगर्जीपणामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचा आरोप करून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्याना निवेदनाद्वारे तक्रार दिली होती . या तक्रारीची दखल घेण्यात आली असून संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली असल्याचे देवेंद्र पाटील यांनी सांगितले. दरम्यान शिकाऊ डॉक्टरांकडून २४ तास सेवा बजावली जात असून पुरेसे वॊर्डबॉय आणि नर्स देखील पुरेसे नसल्याने अडचण होत असल्याचे एका डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटींवर सांगितले.
देवेंद्र पाटील यांनी म्हट्ले आहे कि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कोरोना आजाराला जबाबदार असलेल्या काही गोष्टींचा धक्कादायक खुलासा एका पत्रकाद्वारे ई-मेल व ट्विटरच्या साह्याने मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे केला आहे. कधीकाळी ग्रीन झोन मध्ये असणारे जळगाव जिल्ह्याने आता रुद्र अवतार धारण करत रेडझोनच्या अति गंभीर परिस्थितीमध्ये पदार्पण केले आहे.
जळगाव जिल्ह्यात 174 कोरोना बाधित रुग्णांची संख्या झालेली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोणाच्या या विस्फोटाला सर्वस्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन, महाविद्यालयाचे डीन हे जबाबदार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शासकीय महाविद्यालयांमध्ये 235 विविध विभागांचे डॉक्टर नियुक्त आहेत. परंतु कोरोणा सारख्या महामारी मध्येही अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी शासकीय महाविद्यालयाचे हे पुरेसे डॉक्टर्स अजूनही आपल्या आपल्या कार्यावर रुजू झालेले नाहीत.
या डॉक्टरर्सला पाठीशी घालणाऱ्यांची चौकशी व्हावी
महाविद्यालयाच्या डॉक्टर्सला शासनाकडून दरमहा लाखो रुपयांचे वेतन मिळत आहे याची पूर्ण कल्पना महाविद्यालयाचे डीन यांना आहे .वेळोवेळी प्रशासनाकडून या डॉक्टरांना हजर होण्यासाठी सांगितल्यावरही स्वतःला कोरोणा होऊ नये या भीतीपोटी काही डॉक्टर्स अजूनही शासकीय महाविद्यालय म्हणजेच कोवीड रुग्णालय येथे हजर झाले नाही. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आज जिल्ह्यामध्ये कोरोणाची अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे.
डॉक्टरर्स घेताहेत फुकटचा पगार ?
प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्यानंतरही अत्यावश्यक सेवेमधील डॉक्टरांनी व राज्य सरकारने जे शासकीय महाविद्यालय कोवीड रुग्णालय म्हणून अधिग्रहित केले आहे, त्या महाविद्यालयातील डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारीवर्ग तात्काळ हजर राहण्याची सूचना लॉक डाऊन च्या पहिल्या दिवसापासून दिलेली आहे असे असल्यानंतरही जळगाव येथील शासकीय महाविद्यालयाचे काही डॉक्टर्स अजूनही कार्यापासून मुक्त आहेत व निव्वळ कोरोणाच्या भीतीपोटी हे डॉक्टर्स घरी बसून शासनाचा फुकटचा पगार घेत आहे मग अशा डॉक्टरांचे करायचं काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
डॉक्टरांचे परवाने रद्द झाले पाहिजे
मेडिकल कौन्सिल व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने तात्काळ या सर्व डॉक्टरांचे परवाने रद्द करावे. जळगाव येथील शासकीय महाविद्यालयातील कोवीड रुग्णालयाचे 235 डॉक्टर कार्यावर का रुजू झाले नाही ? याची सर्व माहिती जिल्हाधिकारी यांनी तात्काळ शासकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर खैरे यांच्याकडून मागवावी व या अत्यावश्यक दिवसांमध्येही सेवा न देणाऱ्या व हजर न झालेल्या डॉक्टरांचे तात्काळ परवाने रद्द करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्हाधिकारी तसेच आरोग्यमंत्री यांच्याकडे केली
या संपूर्ण प्रकाराची सीबीआयकडून चौकशी झाली पाहिजे कारण 235 डॉक्टर्स यांनी केलेली ड्युटी व घेतलेला पगार याच्यामध्ये तफावत आढळून येत आहे अशा असंवेदनशील व बेजबाबदार डॉक्टरांच्या विरोधात शासनाने कठोर कारवाई करावी अन्यथा जळगाव जिल्हा एन एस यु आय च्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे .