इच्छादेवी चौकातील घटनेप्रकरणी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पोहोचली चारवर
जळगाव (प्रतिनिधी) :- वाहनामध्ये गॅस भरताना टाकीचा स्फोट होऊन गंभीररित्या भाजले गेलेल्या सूरज भरत दालवाले (२३, रा. यमुना नगर) या तरुणाचा सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच दिनांक ९ नोव्हेंबर रोजी त्याचे वडील भरत सोमनाथ दालवाले (५५, रा. यमुना नगर) यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता.
इच्छादेवी चौकात राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या घटनेप्रकरणी स्फोटातील गंभीर जखमींपैकी चौथा बळी गेल्याने नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, एकीकडे बापलेकाचा मृत्यु झालाअसून लहान मुलगा व आईवरदेखील उपचार सुरू पासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल आहेत.
इच्छदेवी चौकात वाहनात गॅस भरताना टाकीचा स्फोट होवून वाहनात बसलेल्या दालवाले कुटुंबियांसह ११ जण गंभीर जखमी झाले होते. या कुटुंबातील भरत दालवाले यांचा ९ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांचा मुलगा सुरज याचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरज हा एका कापड दुकानात बिलिंगचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. याव्यतिरिक्त गॅस सेंटर चालक व वाहन चालकाचा देखील मृत्यू झाला आहे.या स्फोट प्रकरणातील एकूण मयतांची संख्या चार झाली आहे. याआधी गॅस सेंटर चालक दानिश शेख वाहन चालक संदीप शेजवळ यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.