भडगाव येथे घडली होती घटना
भडगाव (प्रतिनिधी) : बस स्थानकाजवळील चहाच्या दुकानातील सिलिंडर स्फोट प्रकरणात हॉटेल चालकाचा मुलगा जखमी झाला होता. त्याचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला.
सोहिल शेख रफिक मनियार (वय २८, रा. ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. बस स्थानकानजीक असलेल्या चहा दुकानात दि. १४ रोजी दुपारी गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात सोहिलसह १३ जण जखमी झाले. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर धुळे येथे उपचार करण्यात आले. तिथून त्यास छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले होते. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.