चौगाव (प्रतिनीधी) – चौगाव – चुंचाळे येथे कार्यरत असलेले तलाठी भुषण पाटिल यांच्या भुषण कामगीरीचीच सध्या चौगावात चर्चा होत आहे.तलाठी कार्यालयात हेरफाटे मारण्याचा अनुभव तर सर्वांनीच अनुभवला आहे.पण आपल्या सजेतील सर्व शेतकऱ्यांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अनेक शासकीय योजनांची माहीती देऊन दिवसातून दोन वेळा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भेटीला जाणारा व शेतकऱ्यांच्या जागेवर अडचणी सोडणारा तलाठी म्हणजे भुषण पाटील.
शासनाची नविन योजना “माझी शेती माझा सातबारा,मीच लिहीणार माझा पिक पेरा” या ई पिक पाहाणी मोबाईल ऐप विषयी शेतकऱ्यांना माहीती देण्यासाठी मंगळवार दि.१७/८/२०२१ रोजी सकाळी आठ वाजता भुषण पाटिल यांनी चौगाव येथील उंबरसिंग लालसिंग पाटिल यांच्या गावालगत शेतात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना बोलवून या ऐप विषयी माहीती दिली. व काही शेतकऱ्यांकडून जागेवर त्यांच्या शेताचा पिक पेरा शेतकऱ्यांकडून लावून घेतला.
एवढेच नव्हे तर परत संध्याकाळी सर्व शेतकरी घरी आल्यावर पुन्हा गावात येऊन या ऐप बाबत सर्व तरूण मित्रांना प्रशिक्षीत करून ज्या शेतकऱ्यांना या विषयी फारशी माहीती नाही किंवा ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांना सहकार्य करण्याचे अवाहन केले.एवढ्या जलद गतीने भुषण पाटलांच्या “भुषण” कामाचे चौगाव चुंचाळे सजेतूनच नव्हे तर संपुर्ण तालुक्यातून कौतूक केले जात आहे. गाव तेथे तलाठी नव्हे तर शेत तेथे तलाठी अशी कामगीरी भुषण पाटलांनी अवलंबीली आहे.








