जळगावातील शनिपेठ येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील शनिपेठ परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घराचे लोखंडी गेटवरून आत प्रवेश करून चोरटयांनी वस्तू चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिलाबाई रामनारायण जोशी (वय ७२) या घरगुती खानावळचा व्यवसाय करीत आहेत. त्या शनी मंदिरमागे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. संशयित आरोपी ओंकार योगेश सोनवणे रा. रिधुर वाडा, शनिपेठ याने लिलाबाई जोशी यांच्या मालकीच्या बंद घरातून लोखंडी गेटचे व भिंतीच्या मधील जागेतून प्रवेश केला. घरातून ८०० रुपये किमतीचे रिकामे सिलेंडर, १५०० रुपये किमतीची इलेक्ट्रॉनिक शेगडी आणि ४५० रुपये किमतीचा ब्लूटूथ स्पीकर असा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत लिलाबाई जोशी यांनी फिर्याद दिल्यावरून शनिपेठ पोलीस स्टेशनला ओंकार सोनवणे यांच्याविरुद्ध शनिपेठ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.