पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : पिंपळगाव परिसर पोलीस ठाणे हद्दीतील शिंदाड गावातील नामदेव नारायण पाटील यांचे २ बैल व धनराज नारायण पाटील यांच्या ३ गाई, एक बैल अशी ६ गुरे शिंदाड रस्त्यावरून रात्री चोरीस गेले आहेत. याबाबत पिंपळगावहरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील शिंदाड ते वाडी रस्त्यावर असलेल्या शेतातून नामदेव नारायण पाटील यांचे २ बैल आणि धनराज नारायण पाटील यांच्या ३ गायी व १ बैल रात्री अज्ञात चोरट्याने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी धास्तावले असून या शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. या संदर्भात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.