जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात सुप्रीम कॉलनी येथील परिसरात बंद घराची दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि इतर साहित्य असा एकूण ४९ हजार ३०० रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आले आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शरीफ मुराद खाटीक (वय-५२, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांचे घर १३ ते १४ डिसेंबरच्या कालावधीमध्ये बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेऊन बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील गोदरेज कपाटामधून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ४९ हजार ३०० रुपये किमतीचा ऐवज सुरू केला. हा प्रकार रविवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आला. या संदर्भात रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल किरण चौधरी करीत आहे.









